
सार्वजनिक बांधकाम विभाग
भरती 2023
पदाचे नाव : सार्वजनिक बांधकाम विभाग भरती करिता फॉर्म
पोस्ट तारीख : 16-10-2023
एकूण रिक्त जागा : 2109
संक्षिप्त माहिती :
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विविध पदाकरिता मुख्य अभियंता, सा. बां. प्रादेशिक विभाग, मुंबई कार्यालयाकडून जाहिरात आली आहे. ज्या उमेदवारांना रिक्त पदांच्या तपशीलांमध्ये स्वारस्य आहे आणि सर्व पात्रता निकष पूर्ण केले आहेत ते अधिसूचना वाचू शकतात आणि अर्ज करू शकतात.
रिक्त जागा तपशील :
| विभाग | जागा |
|---|---|
| मुंबई | 2046 |
| नागपूर | 17 |
| औरंगाबाद | 16 |
| नांदेड | 15 |
| पुणे | 6 |
| नाशिक | 5 |
| अमरावती | 4 |
पोस्ट तपशील :
| पदाचे नाव | जागा | पात्रता |
|---|---|---|
| कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 532 | 1) 10 वी |
| 2) शासनाने मान्यता दिलेली 3 वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका किंवा तिच्याशी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली सिव्हिल अँड रुरल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग अँड रुरल रिकन्स्ट्रक्शन, ट्रान्सपोर्टशन इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन टेक्नोलॉगी, सिव्हिल अँड एनवायरमेन्टल इंजिनिअरिंग अशी अर्हता धारण केलेली असावी. | ||
| कनिष्ठ अभियंता (विद्युत) | 55 | 1) 10 वी |
| 2) विद्युत अभियांत्रिकी मधील 3 वर्षाची पदविका धारण केलेली असेल किंवा शासनाने जाहिर केलेली त्याच्याशी समतुल्य असलेली इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम आणि इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक (पॉवर सिस्टम) अशी अर्हता धारण केलेली असावी. | ||
| कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ | 5 | 1) 10 वी |
| 2) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तुशास्त्राची पदवी धारण केलेली असावी. | ||
| 3) कॉन्सिल ऑफ आर्किटेक्चर, नवी दिल्ली यांचे नोंदणीकृत सदस्य असावे. | ||
| स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक | 1378 | 1) 10 वी |
| 2) शासनाकडून किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेकडून घेण्यात येणारी किमान स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाची 1 वर्ष मुदतीची पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण, | ||
| किंवा | ||
| शासनाने वेळोवेळी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली आर्किटेक्चरल ड्रॉफ्टसमन (वास्तुशास्त्रीय आरेखक) पाठ्यक्रम उत्तीर्ण | ||
| किंवा | ||
| कन्स्ट्रक्शन सुपरवायझर (बांधकाम पर्यवेक्षक) पाठ्यक्रम उत्तीर्ण अशी अर्हता धारण केलेली असावी. | ||
| 3) स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविकाधारक/ पदवीधारक / पदव्युत्तर अशी उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त असलेले उमेदवार पात्र ठरतात. | ||
| लघुलेखक (उच्चश्रेणी ) | 8 | 1) 10 वी |
| 2) उमेदवाराने लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट अशी अर्हता असल्याबाबतचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे. | ||
| 3) उमेदवाराने इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे. | ||
| टिप :- सदरचे पद हे राज्यस्तरीय पद नाही याची नोंद घ्यावी तथापि, या संवर्गासाठी राज्यस्तरावरच एकच परीक्षा घेण्यात येत असल्याने, राज्यातील कोणत्याही भागातील उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतील. सदरची परिमंडळ वाटपाची प्रक्रिया उमेदवार प्रत्यक्ष रुजु होण्याच्या दिनांकावेळी पदे ज्या प्रमाणात रिक्त आहेत, त्यानुसार पार पाडण्यात येईल व पात्र उमेदवारांना परिमंडळ वाटपाचा हक्क शासनाने राखुन ठेवला आहे याचीही उमेदवारांनी नोंद घ्यावी. | ||
| लघुलेखक (निम्नश्रेणी ) | 2 | 1) 10 वी |
| 2) उमेदवाराने लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट अशी अर्हता असल्याबाबतचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे. | ||
| 3) उमेदवाराने इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे. | ||
| टिप :- सदरचे पद हे राज्यस्तरीय पद नाही याची नोंद घ्यावी तथापि, या संवर्गासाठी राज्यस्तरावरच एकच परीक्षा घेण्यात येत असल्याने, राज्यातील कोणत्याही भागातील उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतील. सदरची परिमंडळ वाटपाची प्रक्रिया उमेदवार प्रत्यक्ष रुजु होण्याच्या दिनांकावेळी पदे ज्या प्रमाणात रिक्त आहेत, त्यानुसार पार पाडण्यात येईल व पात्र उमेदवारांना परिमंडळ वाटपाचा हक्क शासनाने राखुन ठेवला आहे याचीही उमेदवारांनी नोंद घ्यावी. | ||
| उद्यान पर्यवेक्षक | 12 | 1) कृषी किंवा उद्यानविद्या यातील पदवी धारण केलेली असावी. |
| 2) निवासी जागे भोवतीची उद्याने किंवा इतर कोणतीही सार्वजनिक किंवा खाजगी उद्याने किंवा रोपवाटीका (नर्सरी) यांची किंवा या तिन्हींची निगा राखण्याच्या व विकास कामाचा तसेच सार्वजनिक उद्यानात व रस्त्याच्या कडेने झाडे लावणे या कामाचा किंवा बागकामाशी संबंधित अन्य कोणताही, किमान २ वर्ष कालावधीचा प्रत्यक्ष अनुभव धारण केलेला असावा. या अनुभवाचे प्रमाणपत्र संबंधित मालक, जनरल मॅनेजर , विभाग प्रमुख किंवा नियुक्ती प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले असावे. | ||
| सहायक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ | 9 | 1) 10 वी व 12 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
| 2) शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तुशास्त्राची पदवी धारण केलेली असावी. | ||
| स्वच्छता निरीक्षक | 1 | 1) 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कायदा १९६५ (एमएएच एक्सएलआय ऑफ १९६५) अंतर्गत विभागीय मंडळाने विहित केलेली माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा आणि शासनाने त्या परिक्षेची समकक्ष ठरविलेली दुसरी कोणतीही परीक्षा उत्तीर्ण असावा) |
| 2) संचालक, सार्वजनिक आरोग्य यांची मान्यताप्राप्त किंवा शासनाने तिच्याशी समकक्ष ठरविलेली स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्राची परीक्षा उत्तीर्ण असावा. | ||
| 3) जे उमेदवार स्वच्छता अभियांत्रिकी पदवीका धारण करीत आहेत, अशा उमेदवारांना पसंतीक्रम देण्याचा विचार करण्यात येईल. | ||
| 4) पोट कलम II आणि III मध्ये नमूद केलेली शेक्षणिक अर्हता धारण करणारे आणि वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यांना कार्यमग्न ठेवून, स्वच्छतेची कामे करुन घेण्याचा अनुभव ५ वर्षापेक्षा कमी नाही असे उमेदवार. | ||
| वरिष्ठ लिपिक | 27 | 1) 10 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
| 2) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. | ||
| टिप :- सदरचे पद हे राज्यस्तरीय पद नाही याची नोंद घ्यावी तथापि, या संवर्गासाठी राज्यस्तरावरच एकच परीक्षा घेण्यात येत असल्याने, राज्यातील कोणत्याही भागातील उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतील. परिमंडळ वाटपाची प्रक्रिया उमेदवार प्रत्यक्ष रुजु होण्याच्या दिनांकावेळी पदे ज्या प्रमाणात रिक्त आहेत, त्यानुसार पार पाडण्यात येईल व पात्र उमेदवारांना परिमंडळ वाटपाचा हक्क शासनाने राखुन ठेवला आहे याचीही उमेदवारांनी नोंद घ्यावी. | ||
| प्रयोगशाळा सहाय्यक | 5 | 1) 10 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
| 2) विज्ञान शाखेतील पदवीधर (रसायनशास्त्र हा प्रमुख विषय घेऊन) किंवा कृषी शाखेतील पदवी धारण केलेली असावी. | ||
| टिप :-सदरचे पद हे राज्यस्तरीय पद नाही याची नोंद घ्यावी तथापि, या संवर्गासाठी राज्यस्तरावरच एकच परीक्षा घेण्यात येत असल्याने, राज्यातील कोणत्याही भागातील उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतील. मंडळ वाटपाची प्रक्रिया उमेदवार प्रत्यक्ष रुजु होण्याच्या दिनांकावेळी पदे ज्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यानुसार पार पाडण्यात येईल व पात्र उमेदवारांना मंडळ वाटपाचा हक्क शासनाने राखुन ठेवला आहे याचीही उमेदवारांनी नोंद घ्यावी. | ||
| वाहनचालक | 2 | 1) 10 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
| 2) मोटार वाहन अधिनियम, १९८८ (१९८८ चा ५९) मधील तरतूदीनुसार सक्षम अनुज्ञप्ती प्राधिकारी यांनी दिलेला हलके मोटार वाहन किंवा मध्यम प्रवासी वाहन किंवा जड प्रवासी वाहन चालविण्याचा परवाना धारण केलेला असावा. | ||
| 3) शासकीय, निमशासकीय किंवा खाजगी संस्थेमध्ये हलके मोटार वाहन किंवा मध्यम प्रवासी वाहन किंवा जड प्रवासी वाहन चालविण्याचा ३ वर्षाहून कमी नाही इतक्या कालावधीचा अनुभव धारण केलेला असावा. | ||
| 4) ज्यांचा वाहन चालविण्याचा स्वच्छ अभिलेख आहे व ज्यांचेकडे चांगली शारिरीक क्षमता असावी असे उमेदवार. | ||
| स्वच्छक | 32 | 1) शासनाने किंवा इतर समतुल्य व सक्षम प्राधिकाऱ्याने मान्यता दिलेल्या इयत्ता 7 वी मधून बढती दिलेली असावी. |
| शिपाई | 41 | 1) 10 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
| टिप :-सदरचे पद हे राज्यस्तरीय पद नाही याची नोंद घ्यावी तथापि, या संवर्गासाठी राज्यस्तरावरच एकच परीक्षा घेण्यात येत असल्याने, राज्यातील कोणत्याही भागातील उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतील. मंडळ वाटपाची प्रक्रिया उमेदवार प्रत्यक्ष रुजु होण्याच्या दिनांकावेळी पदे ज्या प्रमाणात रिक्त आहेत, त्यानुसार पार पाडण्यात येईल व पात्र उमेदवारांना मंडळ वाटपाचा हक्क शासनाने राखुन ठेवला आहे याचीही उमेदवारांनी नोंद घ्यावी. |
अर्ज फी :
| प्रवर्ग | रुपये |
|---|---|
| खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी: | रु.1000/- |
| मागासवर्गीय उमेदवारांसाठी: | रु.900/- |
| पेमेंट मोड: | ऑनलाइन |
महत्वाच्या तारखा :
| ऑनलाइन अर्ज करण्याची आणि फी भरण्याची सुरुवातीची तारीख: | 16-10-2023 |
| ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: | 06-11-2023 |
| फी भरण्याची शेवटची तारीख: | 07-11-2023 |
वयोमर्यादा :
| खुला वर्ग | 18 - 40 वर्षे. |
| मागासवर्गीय उमेदवार | 18 - 45 वर्षे. |
| दिव्यांग उमेदवार | 45 वर्षापर्यंत शिथिलक्षम |
| खेळाडू उमेदवार | 43 वर्षापर्यंत शिथिलक्षम |
| माजी सैनिक उमेदवार (अमागास) | 40 + सैनिकि सेवेचा कालावधी + 3 |
| माजी सैनिक उमेदवार (मागासवर्गीय) | 45 + सैनिकि सेवेचा कालावधी + 3 |
| विकलांग माजी सैनिक उमेदवार | 45 + सैनिकि सेवेचा कालावधी + 3 |
| स्वतंत्र सैनिक पाल्य उमेदवार | 45 वर्षापर्यंत शिथिलक्षम |
| अनाथ उमेदवार | 45 वर्षापर्यंत शिथिलक्षम |
| भूकंपग्रस्त उमेदवार | 45 वर्षापर्यंत शिथिलक्षम |
| प्रकल्पग्रस्त उमेदवार | 45 वर्षापर्यंत शिथिलक्षम |
| अंशकालीन उमेदवार | 55 वर्षापर्यंत शिथिलक्षम |
अधिक तपशीलांसाठी जाहिरात/सूचना पहा.
महत्वाच्या लिंक्स
| जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
Other Posts You Might Be Interested In:
बुलढाणा जिल्हा कोतवाल भरती 2023 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा
तंत्रशिक्षण संचालनालय गट क भरती 2023 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ गट अ , ब आणि क 2023 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा
नगर नियोजन आणि मूल्यांकन विभाग शिपाई भरती - 2023 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा
कृषी विभाग महाराष्ट्र शासन कृषी सेवक भरती 2023 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा
स्टाफ सिलेक्शन कमिशन कॉन्स्टेबल भरती 2023 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा